संताजी जगनाडे महाराजांची सावली  (पत्नी),  ‘यमुना’

  • 11.1k
  • 2.3k

लेख- संताजी जगनाडे महाराजांची सावली (पत्नी), ‘यमुना’ संत संताजी जगनाडे महाराजांची पत्नी, एवढीच आणि फक्त हीच ओळख. मात्र अजूनही समाजातील स्त्रियांनाच नव्हे तर पुरूषांनाही ‘यमुना’ हे नावही ठावूक नाही ही शोकांतिकाच. आपल्या वारकरी संप्रदायात, भागवतधर्मात भक्ती, अभंग तथा विद्वतेनं संतपद मिळविणारे जगदगुरू संताजी जगनाडे महाराज हे चरित्र आता रूढ झाले. पण संताजी विषयीची आस्था व प्रेरणापुरूष म्हणून जी जाणीव हवी होती ती तोकडीच वाटते. संतांना जातीप्रथेत बांधल्या गेल्यानेही संताजी मराठी भाषिकांपुरतेच सिमित राहिलेत असेही निदर्शनास आले. मात्र तुकारामांचे सहलेखक म्हणून असलेली तोंडओळख यापलीकडेही संताजी हे युगपुरूष होते. मानवतेच्या कल्याणासाठी झिजणारे मार्गस्थ होते. हे लक्षात घ्यायला आता वेळ लागणार नाही. संताजीवरील उपलब्ध साहित्य