पाठलाग (भाग – १९)

(17)
  • 8.1k
  • 4.4k

बंगल्याच्याच आवारातील एक १५ x २० ची खोली दिपकला रहायला मिळाली होती. आठवड्याभरामध्येच दिपक ‘माया मॅडम’च्या स्केड्युलशी समरस होऊन गेला. सकाळी ५.३० ते ६.३० ह्या वेळात बंगल्याच्याच क्लबहाऊसमध्ये मेडीटेशन चालु असायचे त्या वेळेत दिपक आंघोळ करुन तयार व्हायचा. ६.४५ ला सोलॅरीस क्लबवर टेनीस आणि जिम८ वाजता बंगल्यावर परत.८-९ बंगल्यातील स्विमींग पुलमध्ये स्विमींग१० वाजता ऑफीस सकाळी ऑफीसला निघतानाच बंगल्यातील सेक्रेटरी मायाच्या दिवसभरातील बाहेरील मिटींग्सची प्रिंटआऊट दिपकला देत असे. त्यात वेळ, ठिकाण, मॅप आणि फोन नंबर दिलेला असे. ठरल्यावेळी दिपक ऑफीसच्या गेटपाशी गाडी घेऊन थांबे. संध्याकाळी ८ वाजता बंगल्यावर परत९ वाजता आधीच ठरलेल्या कुठल्याश्या हॉटेल्समध्ये पार्टीज, अन-ऑफीशीअल मिटींग्सरात्री १२ पर्यंत बंगल्यावर परत