पहिल प्रेम - भाग 2

  • 9k
  • 1
  • 1.4k

मी आवाज दिल्यावर तिने मागे वळून पहिले आणि समोर चालतं राहिली.मला वाटलं तिला ऐकू आले नसेल म्हणून मी म्हटलं जाऊ दे .दुसऱ्या वेळी बोलू , असं मनात म्हणून चालू लागलो. तिचा विचार माझ्या मनातून जातच नव्हता.तेवढ्यात मला विनोद मी त्याला आवाज दिला आणि शाळेकडे जाण्यास निघालो.असेच तिला बघण्यात सहा महिने निघून गेले .ती काहि मला बघत नव्हती कारण तिला माहीतच नव्हतं की, मी तिच्याकडे बघतो म्हणून मग मी रोज शाळेच्या पायऱ्यावर बसायला सुरुवात केली .मला विश्वास होता कि, ती एकदा तर माझ्याकडे बघेल आणि तो दिवस आला तिने माझ्याकडे बघितले आणि मी एवढा खुश झालो कि ,माझ्या आनंदाला पाराच राहिला