पाठलाग (भाग – २१)

(19)
  • 8.7k
  • 2
  • 3.5k

“माझा प्लॅन रेडी आहे..”, दोन दिवसांनी सकाळी ऑफीसला जाताना माया दिपकला म्हणाली. “दुपारची कॉन्फरंन्स मी गार्डन-कोर्ट ला हलवली आहे, ऑफीसपासुन दुर आहे, जायला निदान तासभरतरी लागेल, तेंव्हा डिटेल मध्ये बोलु. बाहेर कुठे भेटुन बोलण्यापेक्षा गाडीतच बोललेले बरं..” दिपकने मान डोलावुन संमती दर्शवली. ठरल्यावेळी माया ऑफीसमधुन निघाली. बरोबर ऑफीसमधील दोन-तिन डायरेक्टर्स होते, पण ते नशीबाने दुसर्‍या गाडीत बसले.दिपकने गाडी सुरु केली. सुरुवातीचे काही फोन कॉल्स झाल्यावर माया म्हणाली, “आपल्या मित्राचं नाव इन्स्पेक्टर शेखावत आहे. तुम्ही लोकं जेल मधुन पळुन गेल्यानंतर, त्या जेल मधुन त्याची आता बदली झाली आहे. परंतु त्याचा राग अजुनही धुमसतो आहे. तुम्हाला पकडुन त्याला त्याची गेलेली इज्जत परत