पैसा की माणुसकी..

  • 10.3k
  • 1
  • 1.2k

पैसा की माणुसकी....ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून याचा जीवित या मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही आणि तो आलाच तर तो निवळ योगायोग समजावा...                    सकाळचे साधारणतः 10:00 वाजत आले होते.त्यामुळे बँकेत तेवढी गर्दी ही नव्हती,बँकेचा एक एक अधिकारी त्यांच्या वेळेप्रमाणे बँकेत येऊन आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होत होता,आणि आपल्या कामाला सुरुवात करीत होता.काही लोक पैसे भरण्याच्या स्लिप भरत होते तर काही लोक पैसे काढण्याच्या स्लिप भरत होते. सगळे आपापल्या कामात होते. पण एक जण असा होता जो काहीही न करता या सगळ्यांवर नजर ठेवत होता. त्याच नाव होतं अली. तो फक्त दरवाज्याकडे नजर