मात - भाग १०

(55)
  • 14.3k
  • 1
  • 7.9k

रेवतीचे आई -बाबा फारच काळजीत पडले होते..काळजाचा तुकडा असा स्वतःहून विहिरीत पडतोय हे बघून त्याला ते आपल्या डोळ्यांदेखत विहिरीत कसे पडू देणार होते.. रेवतीच्या बाबांचा विरोध होता.. ते रेवतीला म्हणले “भावुकता एकीकडे आणि वास्तविकता एकीकडे.. संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.. मी तुला हा असला वेडेपणा करू देणार नाही..”पण रेवती कोणाचेच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.. त्यामुळे हे प्रकरण जरा वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न रेवतीच्या बाबांनी ठरविले..त्यांनी सुहासला घरी बोलावून घेतले.. एकांतात त्याच्याशी बोलायचे होते त्यांना.. त्यांची काळजी सुहासच्या लक्षात आली होती..तो ही तेच म्हणाला “ती अजिबात ऐकत नाही आहे.. मी तिला माझ्या पासून तोडण्याचा खूप प्रयत्न केला.. पण ती काही ऐकत नाही.. यावर