पाठलाग (भाग – २२)

(17)
  • 7.2k
  • 2
  • 3.6k

दीपक बारमध्ये पोहोचला तेंव्हा बार गर्दीने भरून गेला होता. हवश्या-नवश्यांपासून ते पट्टीचे पिणार्यांपर्यंत झाडून सर्वजण हजर होते. बारच्या एका कोपऱ्यात जुगारांचा डाव रंगला होता. पूर्ण बार सिगारेटच्या धुराने भरून गेला होता. दीपकची नजर शेखावतचा शोध घेत होती. त्याला शोधायला दीपकला फार वेळ लागला नाही. बारच्या काउंटरला लागून असलेल्या एका स्टुलावर तो आपला देह विसाउन बसला होता. हातामध्ये एक बिअरचा मोठ्ठा ग्लास होता. डोळ्यावर गॉगल होता, पण त्याची शोधक नजर बारमधून सर्वत्र फिरत होती. बारच्या दारात उभ्या असलेल्या दीपक वर काही क्षण त्याची नजर स्थिरावली. दोघांची नजरा-नजर झाली आणि मग परत तो इतरत्र बघु लागला. अर्थातच त्याने दीपकला ह्या वेशात ओळखले