मला काही सांगाचंय.... - Part - 3 - 4

(21)
  • 14.8k
  • 1
  • 10.8k

३. अघटित आता सर्व जागीच स्तब्ध झालं होतं. वाहनांची गर्दी आता रस्त्यावरून कुमार पडला त्याठिकाणी व्हायला लागली होती. सगळे लोक काय झालं ? कसं झालं ? एकमेकांना विचारत होते तर काही जवळ जाऊन त्याला बघत होते.... डोक्याला मार लागल्याने भळभळा रक्त वाहत होते. कुमार मात्र डोळे बंद करून पडून होता इतक्यात कुणीतरी फोन करून रुग्णवाहिका बोलावली... काही वेळांत पोलीस हि अपघातस्थळी आले आणि पंचनामा करायला लागले सगळं कसं अचानक घडलं होत. ... लोक आपसात कुजबुज करत होते ... कोण आहे हा तरुण ? कसा घात केला नशिबानं ! काय होईल देव जाणे ! कुणी म्हणत होत खूप रक्त गेलं