पाठलाग (भाग – २३)

(17)
  • 7.6k
  • 4.1k

दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर बघितल्यावर दिपकला पहिला धक्का बसला. आदल्या रात्री ज्याचा खून झाला होता तो शेखावत साधा सुधा इन्स्पेक्टर नव्हता तर तो होता डी.सी.पी.शेखावत – डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस. मधल्या काळात त्याचे प्रमोशन झाले होते. साधा सुधा कोणी इन्स्पेक्टर असता तर कदाचित इतकी हवा झाली नसती, पण मुंबई सारख्या शहराचा डीसीपी आणि त्याच्या आपल्या इथे झालेला खून, त्यामुळेच ही बातमी मिडीयाने उचलून धरली होती. आणि दीपकच्या दृष्टीने मजेशीर गोष्ट म्हणजे अख्या बातमीत कुठेही एका दाढीवाल्या दारुड्याचा आणि शेखावतशी झालेल्या त्याच्या हातापाईचा उल्लेख नव्हता. उलटपक्षी त्याला झालेल्या मारहाणी वरून आणि नंतर गोळी झाडून झालेल्या म्रुत्युवरुन हा एखादा नियोजीत कट होता