आयुष्याचं सारं (भाग -4)

  • 4.2k
  • 2.1k

         मला भेटलेली अनामिका    " पहाटेचे साडेपाच वाजले होते . वातावरणात गारवा , अंगाला भिडणारी       थंडी ,   रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने कडाक्याची थंडी होती . वाटेतील पूल क्रॉस करत डांबरी रस्त्याचा कडेने जाताना रस्ता संपताच धुळीने माखलेल्या नागमोडी वळणाचीसुरुवात झाली . पायवाट चुकल्याची मला जाणीव झाली . "                         झाडांची गर्दी आणि सगळीकडे पसरलेली आल्हादायक शांतता , भयाण शुकशुकाट रातकिड्याचा किर्र किर्र आवाज कानात गुंजत होता आणि तेवढ्यातच एकाझाडाच्या कडेला पाठीमागे कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला . भरधाव रस्तागाठत झपाझप चालणारी माझी  पाऊले धीरगंभीर आणि मंद  झाली होती .अंधारात कुणीतरी रडत होते , तो स्त्रीचा आवाज होता .