प्रेमाचं पुस्तक...!

  • 9.5k
  • 1.7k

प्रेमाचं पुस्तक ...!खोल दरी खोर्यात मोरगाव वसलेलं होतं. चारही बाजुंनी लाल डोंगराचा परिसर व मध्यभागी पन्नास-साठ वस्तीच गाव होतं. डोंगराळ भाग असल्याने गावात आदिवासी लोकांची वस्ती फार मोठ्या प्रमाणात होती. लभाणी, फासे, पारधी अश्या कित्येक आदिवासी जमाती या गावात रहायच्या. प्रत्येक कुटुंब आनंदाने जिवन जगत होतं. दिवसा रानावनात भटकून लाहोर्या, ससे पकडणं हा या लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. गुरूवारी गावाजवळून पाच मैल अंतरावर असणार्या बाजारात या लाहोर्या, सश्यांची विक्री ही आदिवासी जमात करायची. दहा रूपयाला एक अश्या तिन लाहोर्यांची झुंड तिस रूपयाला विकायचे. त्यातून मिळालेल्या पैशातुन आठवड्याचा बाजार व्हायचा.गावात आदिवासींची वस्ती फार मोठ्या प्रमाणात होती. गावात शिक्षणाचा फारसा प्रसार झाला