पाठलाग (भाग-२५)

(19)
  • 6.3k
  • 3.4k

“राणा एक काम करा, आपल्या कंप्युटर ग्राफिक्स डिझायनरला दीपकचा फोटो स्कॅन करून पाठवा. त्याला म्हणाव ह्याचा सर्व तऱ्हेने बदलाव करून त्याचे फोटो करून पाठवा. म्हणजे खूप दाढी वाढवलेला, खूप केस वाढवलेला, पूर्ण टक्कल केलेला, मिश्या आणि लांब केस असलेला… दीपकने नक्कीच आपल्या चेहऱ्यात दिसण्यात बदल केले असतील त्यामुळे त्याला लगेच ओळखण कठीण जाईल. म्हणून शक्य तितके वेगळे लुक्सचे फोटो करून पाठवायला सांग. दीपक कुमार नक्कीच दमण मध्येच आहे आणि त्याने शेखावतला कट करून बोलावून घेतले ह्यामागे त्याची नक्कीच काहीतरी योजना असणार, नाहीतर तोच मुंबईला नसता का गेला. “, डिसुझा बोलत होता. राणाने मान डोलावून सहमती दर्शवली“येस सर, लगेच कामाला लागतो”,