अन लख्याचे जीवन बदलले

  • 3.5k
  • 1
  • 1.4k

रात्र सरून दिवस उजाडला. सूर्याची किरणे हळूहळू धरतीवर पडू लागली. शेतकरी बाया बापडे भाकरी कोरड्यास बांधून घेऊन शेतीच्या कामासाठी गावकुसाबाहेर रवाना झाले. गावातली नोकरदार माणसं नोकरीचं ठिकाण जवळ करू लागली. संथ गतीने जनावरांनी गोठ्यातून बाहेर येऊन चाऱ्याच्या शोधार्थ आपला रस्ता धरला. घराघरात बायांची स्वयंपाकाची लगबग सुरू होती. लहान मुलं मुली शाळेचा रस्ता कापत होती. गावात तशी सर्वांचीच धावाधाव सुरू होती. एकटा लख्या बिचारा अजूनही अंथरुणात लोळत पडला होता. त्याला ना स्वतःची काळजी ना समाजाची.दहा वाजल्यापासून त्याचा दिनक्रम सुरू व्हायचा. मुले मुली शाळेत येण्याची वेळ झाली की शाळेचा परिसर गजबजून गेलेला असायचा. पालकांची मुलांना शाळेत सोडण्यासाठी वर्दळ असायची. सायकली, रिक्षा, दुचाकी