आयुष्याचं सारं ( भाग -10)

  • 4.6k
  • 2k

कुठे शोधू रे मी तुला आता ?? म्हणतात कल्पने पेक्षा वास्तव खूप भयंकर असते . कवी लेखकच तो असतो जो फक्त काल्पनिकतेला वास्तविकतेच वळण देतो . पण वास्तविकता किती भयाण असते तिथे भावनेच्या दरीत कोसळून वेदनांचा तांडव होतो ... मला सख्खा भाऊ नाही पण त्याच्या  रूपात मला सख्खा भाऊ मिळाला होता . त्याची आणि माझी  ओळख म्हणजे कवी विश्वात जगणारी दोन पाखरे होतो . कवितेच्या डहाळीवरून भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारी . ह्या लेखाच्या भावविश्वातून  ओळख झाली तो  माझ्या कविता लेख वाचून भरभरून दाद द्यायचा . आणि माझे विचार त्याला  आवडू लागले  . त्याला  मी दादा म्हणावं भाऊ मानावं हे सारखं वाटायचं तो