११. एक नवीन पहाट डायरी वाचत असता पहाटेचे 5 केव्हा वाजले सुजितला कळलं नाही. डायरीचे शेवटचे पान वाचून झाल्यावर त्याने डायरी बंद करत पापण्यांवर थांबलेले आसवं पुसले. डायरी मांडीवर ठेवून तो तसाच बसला होता, आता त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले होते, रात्री 12 वाजल्यापासून तो जागी होता पण त्याला झोप येत नव्हती कदाचित डायरीत कुमारने जे काय लिहिलं होतं यामुळे; अनेक प्रश्न त्याला पडले होते मग विचार करत असता कुमारच्या आठवणी मनात गर्दी करायला लागल्या अन विचार करत असताच त्याचा डोळा लागला अन त्याला झोप लागली पण एक दीड तास झाला न झालाच वाहनांचा आवाज आल्याने त्याला जाग आली, शहर