माझ्या धर्माविशायीच्या कल्पना

  • 3.5k
  • 2
  • 1.3k

आम्ही शाळेत असताना आम्हाला दररोज प्रतिज्ञा घेतली जायची की सर्व धर्म समान आहेत .आपला भारत विविधतेने नटलेला आहे.तरीही भारतात विविधतेमध्ये एकता आहे .पहिलीपासून ते दहावीपर्यंत तेच ऐकले होते .नंतर कॉलेज मध्ये गेल्यावर त्याचा प्रत्यय आला .मित्रमैत्रिणी वाढत गेले .आणि वेगवेगळ्या जातीमधील आणि धर्मामधील अनेक जणांचा गोतावळा वाढला . इतकंच नव्हे तर मी शालेय विश्वातून जशी बाहेर आले तसे मला अनेक जाती पंथातले लोक भेटले.तेही सर्वसामान्य माणसांसारखेच होते .मला काही त्यात विशेष वावगे वाटले नाही . फ़क़्त थोडा वेगळेपणा होता तो त्यांच्या भाषेमध्ये आणि पोशाख आणि खाद्यपदार्थांमध्ये .आणि तसंही आम्ही सर्व सगळे मिळून खात असल्याने एवढे काही वावगे वाटण्यासारखे नव्हते