भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ७)

  • 7.6k
  • 1
  • 2.8k

सकाळ जरा लवकरच झाली सुप्रीची. घड्याळाचा काटा ७ वर होता. बाहेरचा आढावा घेण्यासाठी तिने हळूच डोकं बाहेर काढलं. अजून उजाडायचे होते. सगळीकडे धुकं होतं. समोरचं तसं पण काहीच दिसतं नव्हतं. उत्सुकता खूप भरलेली होती सुप्रीमधे.... तशी हळूच ती बाहेर आली. बाहेर तरी तिच्या शिवाय कोणीच नव्हतं. बाकीचे tent अजून तरी बंदच होते आणि त्यातील प्राणी अजून चादरीत गुरफटलेले होते. हळूच तिचं लक्ष आकाशच्या तंबूकडे गेलं. तंबूचं प्रवेशद्वार तिला जरा उघडं दिसलं. पुन्हा एकदा कुतूहलाने सुप्री पुढे गेली. एका डोळ्याने तिने आतमध्ये चोरून बघितलं. तर आत कोणीच नव्हतं, तसं तिने पूर्णपणे आत डोकावून पाहिलं. बापरे !!! कुठे गेला हा माणूस... तशीच