ना कळले कधी Season 1 - Part 13

(7.5k)
  • 16.8k
  • 2
  • 13k

आर्या काहीही न बोलता तेथून निघून गेली.सिद्धांतला खूप वाईट वाटले, 'आपण उगाचच बोललो आर्या समोर. पण आर्या खरंच great आहे. आज मानलं तिला. दोघांच्या आयुष्यातही एकच कमी आहे. माझ्या कडे at least वडिलांच्या वाईट आठवणी तरी आहेत. पण तिच्या कडे तर त्याही नाही . तरीही ती कधीही परिस्थितीची तक्रार करत नाही, जे मिळालं त्यामध्ये खुश आहे. आपलं दुःख लपवून आनंदाने जगते आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. शी...... किती वाईट बोललो मी तिला. अस नव्हतं बोलायला पाहिजे, आणि काय चुकीचं बोलत होती ती,चुकी माझीच आहे प्रत्येक वेळेस अजाणतेपणे का होईना पण मी तिला दुखावतोच. आता नाही बोलणार ती