मला काही सांगाचंय.... - Part - 14

(12)
  • 9.2k
  • 1
  • 4.7k

१४. तडजोड कुमारचे आई - वडील , आकाश आणि सुजितचे वडील गावाला पोहोचले. ते कुठेही न थांबता सरळ घरी आले. अंगण कसं रखरखं झालं होतं.. ते दुचाकीहून खाली उतरताच घरासमोर शेजाऱ्यांची गर्दी जमली... आकाशने घराच्या कुलुपाची चावी घेऊन दरवाजा उघडला... जे काही लोक, कुमारला रात्री भेटायला जाऊ शकले नाही.. ते तब्येत आता कशी आहे ते विचारण्या त्याच्या अंगणात जमले होते.... सर्व कुमार कसा आहे..? हाच एक प्रश्न विचारत होते ... वारंवार कुमारचं नाव आणि त्याची विचारणा ऐकून ती माउली व्याकुळ झाली आणि घरात न जाता ... डोळ्यात जमा झालेल्या आसवांना वाट मोकळी करून देत ... दाराच्या पायरीवर बसली . ती