पुरे झाले प्रयोग आता ठोस पावले उचलाप्रदीप जोशी उंड्रीइंग्रजी माध्यमाच्या शाळा एका बाजूने गतीने वाटचाल करीत असताना मराठी माध्यमाच्या शाळांना मात्र उतरती कळा लागली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतील दरवर्षी घटणारी पटसंख्या व बंद पडत चाललेल्या तुकड्या या नकळत मराठी भाषेचीच दयनीय स्थिती दर्शवत आहेत की काय अशी शँका आल्यावाचून रहात नाही. ज्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत तीच मंडळी मराठी माध्यमाच्या शाळांच्या अधोगतीला कारणीभूत आहेत. बंद पडत चाललेल्या मराठी माध्यमाच्या शाळाबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. केवळ विचार देखील करून चालणार नाही तर त्यासाठी उपाययोजनांची ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.पूर्वी केवळ मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. आज परिस्थिती