भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १०)

  • 6.3k
  • 1
  • 2.4k

पुढचा stop म्हणजे आकाशने बघितलेलं गावं ... ते सुद्धा तसं लांबच होतं, पण आकाशच्या calculation नुसार संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. तसाच आकाशचा अंदाज होता. परंतु निसर्गाला ते मान्य नसावं बहुदा. तो लहान डोंगर उतरून ते खाली येतंच होते. तेवढयात ,कुठून कोणास ठाऊक, जोरदार वारा सुरु झाला,अगदी अचानक. सगळेच घाबरून गेले. आकाश सुद्धा बावरून गेला. थोडयावेळाने सावरलं स्वतःला त्याने. पण तो वारा काही कमी होतं नव्हता.त्यात पावसाने सुद्धा सुरुवात केली. अजूनच भांबावून गेले सगळॆ. काय करायचे ते सुचत नव्हते आकाशला. गावं तसं लांबच होतं ते. तिथे पोहोचणं तर गरजेचं होतं. शिवाय त्या वादळापासून सुद्धा या सगळ्यांना वाचवायला हवे. आकाशने वर आभाळात