पाऊसाळ्यात त्वचेची काळजी- पाऊस प्रत्येकालाच हवा हवासा वाटत असतो.. ऊन वाढून वाढून आता अखेर पाऊस बरसायला लागला आहे. वातावरण प्रसन्न झाल आहे आणि पाऊसात करण्यासारख्या बऱ्याच योजना चालू झाल्या असतील. पण अचानक हवामान बदल होतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर दिसायला लागतो. कित्येक जणांना नवीन फॅशन, नवीन स्टाईल ट्राय करण्यात रस असतो. पण फॅशन साठी हा ऋतू गैरसोयीचा ठरू शकतो. याचबरोबर, आरोग्यावर सुद्धा हवामान बदलाचा परिणाम होतो. अस पाहिलं गेल आहे की हवामान बदलामुळे त्वचा आणि केस ह्यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. आणि केस आणि त्वचा ही नेहमी उत्तम ठेवणे गरजेचे असते. पण पाऊसात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या डोक वर काढतात. ते