प्रेरणा - आजी आजोबा

  • 20.5k
  • 1
  • 4.8k

आजी आजोबांचे जीवन म्हणजे एक आगळे वेगळे जीवन असते.जीवना मध्येसंसार करत असतांना अनेक सुख दुःखाचेप्रसंग अनुभवलेअसतात.मुलगा,सून,नातवंड असतात,तस पाहिलं तर आनंदी जीवन.पणमनामध्ये कुठे तरी हूर हूर वाटत असते. असाच एक दिवस,साधारण पणेरात्रीचे नऊ वाजले असतील,नुकतेच जेवणझाले होते.आजी पलंगावर बसल्या होत्या,पण कसला तरी विचार करीत होत्या,तेवढ्यात आजोबा आले,व म्हणाले,अहो!सौ.कसला एवढा विचार करताय,आजी एकदम भानावर आल्या व म्हणाल्या, शेजारच्या सरस्वती बाई भेटल्याहोत्या,त्या म्हणत होत्या,नुकतच चारी धाम यात्रा करून आलो,रामेश्वरला पण जाऊनआलो.आपलं पहाना! आयुष्य गेलं,तुम्ही रिटायर होऊन पाच वर्षे झाली,तरी ना अजून, काशी,ना चारिधाम. एकदा तरी जावं अशी फार इच्छा आहे.परमेश्वराची इच्छा.