अव्यक्त (भाग - 10)

  • 3.6k
  • 1.3k

धुक्याची रात्र....थंडीचा गारवा वाढतच चालला नुकत्याच शरद ऋतुचे आगमन झाले .क्षितिजाच्या पल्याड सुर्य जाऊन मावळतो तसा काहीसा न संपणारा न मिटणारा हा जीवनप्रवास अधोरेखित होतो रोज उजाडतो सुर्य पहाटेच्या किरणांसोबत दिवस ढळत जातो रात्र अधुक आपल्याच धुंदीत काळोख पसरवत पाऊलखुणाने विळखा घालते . त्या रात्रीची मी दिवानी ,मंदमंद वाहणारा तो वारा अंगाला स्पर्श करून जातो मोहात त्या रात्रीच्या मोहून घ्यावे स्वत:ला निसर्गांच्या सान्निध्यात बंद्धिस्त करावे ह्या मनाला किती अल्हादायक ही संजीवसृष्टी म्हणत मी एका भलत्याच शोधार्थात पडले .कुणा जीवाच्या नाही एका वेड्याच आणि खुळ्याच प्रश्नाच्या ..पुर्ण चंद्र झालेली रात्र असते ती पौर्णिमेची .मोकळे आकाश ते न वास्तव्यास त्यांच्या चांदण्याचा सडा