ना कळले कधी Season 1 - Part 18

(6.9k)
  • 17.2k
  • 1
  • 12.3k

'झालं का सिद्धांत तुझं?' 'हो आई, बस एक - दोन मिनिटे.' 'अरे बरा आहेस ना तू?' 'का गं? काय झालं?' 'अरे किती spicy बनवलंय तू जेवण. तू विसरलास का की तुला चालत नाही.' 'आई, मी माझ्या साठी साधं वेगळं बनवलं. हे तुझ्या आणि आर्या साठी बनवलंय. तिला साधं अजिबात आवडत नाही. आणि तुला ही माझ्या मुळे नेहमी साधंच खावं लागतं. so..'  'बरीच माहिती गोळा केलेली दिसतीये तू आर्याची. म्हणजे तिला काय आवडतं, काय नाही.' 'काही माहिती वगैरे नाही गोळा केली मी. हे ट्रिप मध्ये 2 दिवस सोबत होतो तर माहिती झालं thats it. बाकी मला काहीही माहिती नाही तिच्या बद्दल.'