ना कळले कधी Season 1 - Part 19

(25.3k)
  • 18.7k
  • 5
  • 13k

      आर्या ने आज सकाळी सकाळी उठून लवकर आवरलं. तिला आज सिद्धांतच्या भेटीची खूप ओढ लागली होती. केव्हा एकदा सिद्धांतला भेटेल अस झालं होतं. तिला सतत सिद्धांत बरोबर घालवलेले क्षण आठवत होते. कुठेतरी सिद्धांत तिला आवडत होता हे आता तिच्या मनालाही पटत होत. ती ऑफिस साठी निघाली तिने नेहमीसारखाच फोन silent करून बॅग मध्ये टाकला आणि निघाली. इकडे सिद्धांत पण आवरून निघाला. त्याला वेळेत पोहचायचं होत कारण त्याची एक महत्त्वाची मीटिंग होती. पण ऑफिसच्या जवळपासच संपूर्ण रस्ता ब्लॉक केला होता. त्याने गाडीतून खाली उतरून चौकशी केली तर त्याला कळलं की कुठल्यातरी मुलीचा accident झाला आहे. आणि तिला बरच लागलं