निघाले तेव्हा सकाळचे ७.३० वाजले होते. सूर्य जणू नुकताच वर येत होता. त्यामुळे पूर्वेकडचे आभाळ सोनेरी रंगाने नटून गेलं होतं. पावसाची काहीच चिन्ह नव्हती, म्हणूनच कि पक्ष्यांची सकाळ लवकर होऊन ते आपापल्या कामाला निघून गेले होते. त्यांच्या जाण्याने झाडं चिडीचूप झाली होती.... जमिनीवर सगळीकडे हिरवी रानटी गवत पसरलेली होती. त्यावर किड्यांची मैफल जमली होती. मधेच एक पायवाट, त्यावर सारखं सारखं चालून तयार झाली होती, इथून लोकांची सारखी ये-जा होतं असते, याचे प्रतिक होतं ते. सकाळचे धुकं आता त्या गवतांच्या पानांवर विसावलं होतं, थेंबांच्या रूपाने... त्यावर सूर्याची किरणे पडून, थोडावेळ का होईना.. गवताला सोन्याची किंमत आली होती. चालता चालता आकाशची नजर