धुक्यातलं चांदणं .....भाग १

(26)
  • 25.4k
  • 3
  • 21.7k

"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो. "," तू नाही रे, आपण दोघे. किती महिने झाले … एकत्र गेलोच नाही आपण. " तसा विवेक हसायला लागला. " अगं सुवर्णा… तुला माहित आहे ना. रविवार हा फक्त आणि फक्त माझाच दिवस असतो. तुला यायचं असेल तर तूही येऊ शकतेस. " ," OK , नको तू एकटाच जा. " ," बघ आता …. बोलावतो आहे तर येत नाहीस आणि म्हणतेस कूठे गेलो नाही फिरायला खूप दिवस. " ,"त्या जंगलात वगैरे मला