ना कळले कधी Season 1 - Part 22

(13)
  • 10.3k
  • 1
  • 8.4k

  सिद्धांत घरी आला तो फार थकला होता. 'काय रे सिद्धांत आज बराच वेळ झाला, खूप काम होत का?', त्याच्या आई ने विचारलं. 'नाही गं आई, आज आर्याचा accident झाला तर हॉस्पिटलमध्येच होतो इतक्या वेळ.' 'बापरे कुठे? लागलं तर नाही ना तिला जास्त? आणि आता कशी आहे ती?' 'आई किती प्रश्न विचारणार आहेस. घाबरू नको आता ती बरी आहे. सकाळी डिस्चार्ज मिळणार आहे. सगळे रिपोर्ट्स पण नॉर्मल आले.' 'मग तू का नाही थांबला? काही लागलं वगैरे तर रात्री.' 'अग तिच्या घरचे आहे, आणि तिला झोप लागली होती आता. आणि मी डॉक्टरांना बोललो ते ही म्हणाले घाबरण्याच काहीही कारण नाही. म्हणून मी