धुक्यातलं चांदणं .....भाग ३

  • 15.6k
  • 12.7k

धावतच ते ऑफिसच्या बाहेर आले. " कूठे भेटणार आहात ? " ," स्टेशनला "," किती वेडा आहेस रे तू , स्टेशनला कोणी बोलावते का भेटायला. " , सुवर्णा हसत म्हणाली. " अरे , तिला घरी जायला लेट होईल ना मग, म्हणून स्टेशनला बोलावलं " ," ठीक आहे मग ." विवेक आनंदात होता आज, चेहरा तर किती खुलला होता. " विवेक विचारू का एक ." ," विचार." ," अगदी सहजच ना भेटायला चालला आहेस " ," का गं ? " ," तुझ्यात खूप बदल अनुभवते आहे मी. नक्कीच काही नाही ना." विवेक जरा बावरला." नाही, असं का वाटतं तुला ? " ," नाही