पॅन्टवाली मुलगी

  • 7.7k
  • 3
  • 2.7k

पॅन्टवाली मुलगीरसुलवाडी डोंगर कपारीतले एक गाव. 500 घराचा उंबरा. वाडी असली तरी शहरीकरणाच्या छायेतले गाव. मातीच्या सारवाव्या लागणाऱ्या भिंती जाऊन सिमेंट काँक्रीटचे बंगले उभे राहिलेले. गावानं गावपण मात्र जपलेले. आठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. बारा बलुतेदारानी आपली बलुतेदारी कायम ठेवलेली. लोहार, चांभार, शिंपी, बामण, वाणी, न्हावी समदी मंडळी एकोप्याने रहात होती. गावाला पण निसर्गाने आगळे वेगळे लेणे बहाल केले होते. गावाच्या एका टोकाला नदी होती. ती बारमाही दुथडी भरून वाहत होती. नदीकाठावर चार पाच पुरातन मंदिरे होती. वर्षातून एकदा गावजत्रा भरत होती. जत्रेला हौशे, नवशे, गवशे समदे येत होते. नदीकाठाला गावस्वरूपी एकच स्मशानभूमी होती. गावातले कधी कोण गचकले