AGENT - X (2)

  • 7.7k
  • 5.7k

२. इन्स्पेक्टर मिलींद हजारेनं त्याच्या केबिन मध्ये येऊन आपली टोपी व काठी वैतागानं टेबलवर आदळली आणि त्यानं आपल्या खुर्चीत स्वतःला झोकून दिलं."सातवा खून!" घाम पुसत तो समोर बसलेल्या मिस्टर वाघला म्हणाला.मिस्टर वाघ हजारे येण्याअगोदर एक अर्धा तास आधी येऊन मस्तपैकी कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेत बसला होता. "सिरीयल किलर?" तोंडातली भजी चावत आणि चहाचा घुटका घेत त्यानं हजारेला विचारलं."वाटतंय तसंच. पण प्रत्येक खुनाचा पॅटर्न वेगळा आहे. म्हणून एकाच व्यक्तीनं सगळे खून केलेत असं समोर प्रथमदर्शनी तरी वाटत नाही, पण एकाच शहरात सलग खून होतायत म्हंटल्यावर ते कोणीतरी एकटाच किंवा एक टोळी करते आहे असंच वाटतं...!""कन्फ्युजिंग! हं?""येस!""मी तुमचं कन्फ्युजन दूर करतो! हे कोणीतरी