AGENT - X (3)

  • 7.4k
  • 4.7k

३.आणखी एक मृत्यू झाला होता. धन्वंतरी फार्माचा तिसरा बोर्ड मेंबर, सत्तेचाळीस वर्षीय नारायण सांगावकर आपल्या लिविंगरूम मध्ये विस्कटला होता. हो. विस्कटला म्हणतोय; कारण त्याच्या शरीराच्या वरचा भाग कापून तुकडे करून लिविंगरूम भर विखुरले होते. मिस्टर वाघ त्या ठिकाणी पोहोचला. तो येण्याआधी पंचनामा उरकून हजारेनं सर्वांना तेथून बाहेर काढलं होतं. मिस्टर वाघ या केसवर काम करतोय हे त्याला कोणालाही कळू द्यायचं नव्हतं. मिस्टर वाघनं बॉडी पाहिली. मृताचा गळा चिरण्यात आला होता."किचन नाईफ वापरलंय!" मिस्टर वाघ बॉडी एक्झामाईन करत मागेच उभ्या असलेल्या हजारेला म्हणाला."किचन मधला चाकू? कशावरून?" हजारेनं आश्चर्यानं विचारलं."बॉडीवरील कट बघा. खांद्यापासून वर चिरलंय. एखाद्या गाईला कापावं तसं. कुकिंगच्या भाषेत याला 'चक स्टेक