धुक्यातलं चांदणं .....भाग ६

(12)
  • 10.9k
  • 7.1k

थोडयावेळाने पूजा भानावर आली. " खाली बसूया का ? " पूजाने विचारलं. तसे दोघे तिथेच बसले. " तुला काय सांगू विवेक … एवढा हिरवा रंग मी पहिल्यांदा पाहत आहे… आणि हे आभाळ … इतकं मोठ्ठ असते, ते आज कळते आहे मला.… मला …. मला ना… शब्दच नाही आहेत माझ्याकडे आज. " , " तू विचारलं होतंस ना… एवढं काय आवडते, उत्तर मिळालं का ? " , " हो… नक्कीच मिळालं. " , " हा निसर्ग आहे ना, तो विविधतेने भरलेला आहे. आपल्याला तो वेगळेपणा असा शोधावा लागतो. " विवेक छान बोलत होता आणि पूजा ऐकत होती. " तुला भीती नाही