बकुळीची फुलं ( भाग - 1 )

  • 11k
  • 5.6k

खडबडीत रस्त्यावर सामसूम होती …. रात्री पाऊस पडून गेल्याने पाण्याने रस्ते नाहून निघाले होते . गटारे , नाल्या तुडूंब भरल्या होत्या …. रस्त्याच्या कडेला असलेली बकुळाची झाडे लक्ष वेधून घेत होती . त्या बकुळाचं आणि आपलं खूप अगत्याचं नातं असावं असा अनुज झाडांकडे बघत होता मधेच समोर पाऊलं टाकत पुढे चालत होता … समोर गेला की परत मागे वळून त्या झाडाकडे बघत होता क्षणभरासाठी त्याला वाटलं की त्या झाडासमोर स्तब्ध उभं राहून काहीतरी बोलावं …एवढ्यात त्याला मागून कोणी तरी आवाज दिला .“अनुज …. अनुज … थांब ! ” ओळखीचाच पण खूप वर्षांनी ऐकलेला तो आवाज ऐकूून तो मागे वळला .”