अजूनही वाट पाहतेय ती...

  • 5.7k
  • 1
  • 1.7k

अजूनही वाट पाहतेय ती...ती नेहमी पावसाची वाट पहायची. हात फैलावून डोळे मिटून चिंब चिंब भिजायची. मोहरून जायची. म्हणायची,'ये... ये... मुसळधार ये... रिमझिम ये... कसाही ये ... ''भिजवून टाक मला.''तुझ्या बाहुपाशांत सामावून घे मला.''घट्ट आलिंगन दे.''एकरूप होऊन जाऊदे मला तुझ्यात...' काळेभोर टप्पोरे डोळे, रेखीव भुवया, नाजूक पण सरळ नाक, गौरवर्ण अशी ती. नेहमी केसांची वेणी घातलेली. त्यात एखादं गुलाबाचं फुल असणारचं. कधी गुलाबी, नारंगी, लाल, पिवळ्या, पांढऱ्या रंगाचं गुलाब असल्याशिवाय ती कधी परिपूर्ण वाटलीच नाही. ऑफिसला स्कुटीवरून जायची पण एकदम फुल फ्रीडम मध्ये. डोक्यात हेल्मेट नाही की तोंडावर स्कार्फ नाही. भुर्रकन निघून जायची. आजूबाजूची लोकं चार हात लांबच