बकुळीची फुलं ( भाग - 3 )

  • 8.4k
  • 3.8k

कॉलेजचा दुसरा दिवस उजाडला . पहिल्याच दिवशी अनुजला चांगला ग्रुप मिळाला होता . आणि अनुजने त्याच दिवशी ठरवलं आपण ह्याच ग्रुपला धरून राहायचं ... छान आहेत ना सर्व .... हसरी मालती , बोलकी रेवा , निख्या तो तर जाम भडकतोच कधी कधी लहरी आहे तो ... प्रितम आहे बऱ्यापैकी मनमिळावू वृत्तीचा ... आदिती , तिचं नाव ओठावर येताच तो गालातल्या गालात हसला ... आधी वाटायचं मला , खूप रागीट असावी पण मनाने कशी भडभडी आहे ती .... तसच असायला पाहिजे तेव्हाचा राग , रुसवा तेव्हाच समोरच्या व्यक्तीवर काढून मोकळं झालेलं बरं ! नाही तर कुणाला सवय असते कुणाचा राग कुणावर