AGENT - X (6)

  • 4.6k
  • 2.8k

६.मिथिल आपल्या प्रपोसलचा हेका काही केल्या सोडायला तयार नव्हता. मिस्टर वाघ येऊन गेल्यानं तो बिथरला नक्कीच नव्हता, पण सावध मात्र झाला होता. मिस्टर वाघ गेल्या-गेल्या सगळ्या ऑफिसमध्ये शोधाशोध करून त्यानं लगेच तातडीची बोर्ड मीटिंग बोलावली,"गेल्या काही दिवसांत झालेल्या नुकसातून हीच एक डील आपल्याला बाहेर काढू शकते." तो मीटिंग मध्ये म्हणाला.हेच मिथिल पुन्हा पुन्हा सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यासाठी पुन्हा मिस्टर वाघ येऊन गेल्याच्या दिवशी तातडीची मिथिलनं बोर्ड मीटिंग त्यानं बोलावली होती..."जे झालं, ते वाईट झालं... आपले तिसरे बोर्ड मेंबर सांगावकर अकाली मृत्यूमुखी पडले..." अत्यंत कळवल्यानं तो बोलला."खून आहे तो..." बावन्न वर्षांचा निशांत पुरोहित हा बोर्ड मेंबर मिथिलला