स्वर्गातील साहित्य संमेलन

  • 9.7k
  • 1
  • 2.8k

* स्वर्गातील साहित्य संमेलन! * अखिल भारतीय मराठी साहित्य महानमंडळाची ती भव्यदिव्य इमारत! एखाद्या देशातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला नसेल अशा त्या सुसज्ज इमारतीच्या एका मनमोहक दालनात महानमंडळाची सभा सुरू होती. अध्यक्ष ठोके पाटील आसनस्थ झाले. सचिवांनी रीतसर सभेचे कामकाज चालू केले. महानमंडळाच्या अध्यक्षांचा दर्जा पंतप्रधानांच्या बरोबरीचा असला तरीही अध्यक्षांना पंतप्रधानापेक्षा काकणभर अधिक सवलती होत्या. सोबतच महानमंडळाच्या प्रत्येक सभासदाला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा होता. गत् दोन दशकांपासून अधिक वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही अभाषिक मराठी