धुक्यातलं चांदणं ..... भाग ८

  • 11.9k
  • 6.4k

पूजाने काही response नाही दिला त्यावर. सुवर्णाच बोलली, "Sorry, पण मला वाटलं तसं… "," It's OK, माझ्यात आणि विवेकमध्ये फक्त आणि फक्त Friendshipच नात राहील, याची काळजी घेईन मी."," ते ठीक आहे. तरी सुद्धा एक सांगते. तो जेव्हा डॉक्टरकडे treatment घेत होता ना , तेव्हा डॉक्टर सांगायचे, याची खूप काळजी घ्यावी लागेल. त्याला दुखवू नका … त्याच्या घरच्यांचं माहित नाही मला… त्याने घरचा कधी विषय काढला नाही. पण मी खूप काळजी घ्यायची त्याची, आजही घेते. तो आता बरा झाला आहे पण डॉक्टरने सांगितलं कि त्याला पुन्हा कधी depression मध्ये जाऊ देऊ नका… त्याचं मन खूप कमजोर आहे. त्याला परत धक्का