कॉलेज संपून तीन महिने झाले होते ... सर्व डिग्री घेण्याकरिता कॉलेजमध्ये आले ... निखिल , रेवा , अनुज , प्रितम ...... मालती सर्व कॉलेजच्या गेट समोरच भेटलीत . एकदाच कॉलेज संपल्यावर असं रोज रोज भेटणं आता कुणालाच शक्य नव्हतं . कॉलेजच्या आठवणी तश्याच ताज्या होत्या , रोजच्या पाणीपुरीची निखिलला आठवण झाली . कॉलेजच्या गेटसमोरून जातानाच त्याचं लक्ष बाजूच्या चारचाकीवर गेलं , आणि त्याने तिथेच साऱ्यांना थांबवून घेत पाणीपुरी खायचा हट्ट केला .... तारुण्यही कधीकधी बालिशपणाने जगायला भाग पाडतं ते असं .... वाऱ्यावर हलणारा बोर्ड ’ --------- स्पेशल पाणीपुरी सेंटर’ . आणि कॉलेजच्या बाजूला उभी रहाणारी ती चारचाकी , बहुतेकांना आपल्याकडे आकर्षित