AGENT - X (9)

  • 5k
  • 2.5k

९."तुम्ही त्या बिल्डिंगमधे काय फेकलंत?" मी विचारलं.या सलग घडणाऱ्या आणि विलक्षण घटना ऐकून माझा श्वास रोखला गेला होता. रिलीफ मिळावा म्हणून मी मिस्टर वाघला प्रश्न केला. मला जाणून पण घ्यायचं होतंच, की त्यानं काय कारभार केलाय..."त्यांना नर्व 'व्हिएक्स' हवं होतं. ते दिलं!" तो सहज म्हणाला."म्हणजे? आणि हे व्हिएक्स, हे नर्व एजंट्स... काय भानगड काय आहेत?" मी कापाळावर आठ्या आणत विचारलं."नर्व एजंट्स आर केमिकल वेपन्स!" त्यानं शाब्दिक बॉम्ब फोडला,"व्हिएक्स हा त्यातील एक अत्यंत विषारी प्रकार! शॉर्टफॉर्म फॉर 'वेनमस एजंट एक्स' केमिकल फॉर्म्युला C11H26NO2PS! लिक्विड, क्रीम व गॅस फॉर्म्समध्ये हे आढळतं. हे एक अत्यंत प्राणघातक असं नर्व एजंन्ट आहे. संयुक्त राष्ट्रानं मोठ्या