धुक्यातलं चांदणं....... भाग ११

(11)
  • 8.4k
  • 5.8k

पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छतेने भरलेलं. विवेकने ओळखलं." अजून तुझी सवय गेली नाही वाटते.… पावसात भिजण्याची. अजूनही कॉलेजमध्ये आहेस वाटते… " विवेकच्या मनाला लागलं कुठेतरी. मान खाली घालून तो तसाच उभा होता. थोड्यावेळाने त्याने मानसीला विचारलं," कशी आहेस ?"," मजेत आहे, आनंदात आहे."," छान आहे.","तुझं काय चालू आहे… जॉबला आहेस का ?… कि फक्त कथा-कविता लिहिण्यात वेळ घालवतोस अजून. " जणू काही मानसी त्याचा अपमान करायलाच आली होती.विवेकला पुन्हा वाईट वाटलं. एकेकाळी त्याच्या कवितांवर वेडी होणारी, आज त्याला त्यावरच बोलून दाखवत होती. " जॉबला