** भाजीसम्राट ** "अहो, ऐकलत का? भाजी आणायला जाताय का? नाही तर मी जाऊ का? तसे सांगा. मला कुणी खात नाही. ओरडून ओरडून तोंडाला फेस यायची वेळ आली. परंतु तुमच्या कानात माझा आवाज शिरत नाही. सारख आपलं मोबाइल... मोबाइल! वीट आलाय बाई." आतून पद्माचा आवाज आला."जातोय. चाललोय. निघालोय. आणि प्रत्येक वेळी तुझे 'तुम्ही जाताय का मी जाऊ?' हे ब्रम्हास्त्र वापरत जाऊ नकोस. नुसती भीती दाखवून दाखवून एखादेवेळी वापरायची वेळ आली तर फुसका बार ठरेल.""व्वा! ब्रम्हास्त्र काय?