धुक्यातलं चांदणं ....... भाग १२

  • 7.6k
  • 5k

Next day, विवेक नेहमीप्रमाणे ऑफिसला आला. आल्या आल्या सवयीप्रमाणे,त्याने पूजाला call लावला. खूप वेळ रिंग वाजत होती. दुसऱ्यांदा call लावला. यावेळी तिने cut केला. पुन्हा लावला, पुन्हा cut केला. " झालंय काय हिला… ?",विवेक विचारात गढून गेला. सुवर्णा आली तितक्यात. विवेकला बघितल्यावर कालची आठवण झाली तिला. जरा वाईट वाटलं. पण ते सगळं विसरून, काही झालंच नाही या अविर्भावात त्याच्या समोर येऊन बसली. " काय झालं रे, सकाळी सकाळी चेहरा का पडलेला. ?","पुजू call नाही उचलत… असं करत नाही कधी ती.","असं का… अरे तिला काम असेल काहीतरी म्हणून उचलत नसेल. "विवेकला पटलं ते. मग तो कामाला लागला. सुवर्णाने सुद्धा कामाला सुरुवात केली.