ना कळले कधी Season 1 - Part 32

(21)
  • 10.4k
  • 2
  • 7.4k

      सिद्धांत सकाळी आर्याला घ्यायला आला. आर्या छान तयार होऊन आली. सिद्धांत मनातच म्हणाला अशी इतकी छान तयार होऊन येत जाऊ नको ग, गाडी चालवताना लक्ष नसत माझं मग! ती आली त्याचा बाजूच्या सीट वर बसली चला निघायचं, आर्या म्हणाली. बाय द वे जायचं कुठे आहे. म्हणजे तिच्या घरी or बाहेर कुठे आर्याने त्याला विचारलं. अग हो आर्या थोडा धीर धर तिकडेच निघालो आहे आपण कळेलच  थोड्या वेळात. बर नका सांगू मला असही काय करायचं आहे, बर कोण आहे ती मुलगी काय करते? कुठे शोधली? नाव काय आहे? फोटो असेल ना एखादा बघू मला आर्या म्हणाली. मला तर