“मावशी ! मावशी !” “सारे बोलतो हो नलू.” सायंभोजने झाली. सायंप्रार्थना झाली. आणि सरला, उदय, नलू तिघे बोलत बसली होती. प्रकाश बोलत होता. खेळत होता. शेवटी तो आईच्या जवळ तेथे निजला. सरलेने नलूला सारी वार्ता सांगितली. उदय सद्गदित होऊन म्हणाला, “नलू, माझी सरला अशा दिव्यातून गेली !” “उदय, तुझ्यावर मी एक गोष्ट लिहिणार होते.”