चकाकते ते सोने...

  • 11.8k
  • 1
  • 3k

चकाकते तेच सोने! भर दुपारची वेळ होती. सूर्यदेव डोक्यावर आले असले तरीही उन्हाची तीव्रता मुळीच जाणवत नव्हती. सूर्यकिरणांनी सृष्टीला कवेत घेतले असले तरी धग जाणवत नव्हती. असे वाटत होते की, आलेली किरणे ही सूर्याची नसून चंद्राची आहेत. अशा मोठ्या प्रमाणात थंडी सर्वत्र पसरली होती. गेल्या अनेक दिवसांपासून आलेली थंडीची लाट तळ ठोकून होती. शहरातील एका नवीन वसाहतीत असलेल्या एका इमारतीत राहणाऱ्या बायका घरातील थंडी टाळण्यासाठी गरम गरम उन्हात बसल्या होत्या. "अग बाई, काय ही थंडी म्हणावी. स्वेटर, शाल कशानेही