प्रेमपरीक्षा

(11)
  • 11.1k
  • 1
  • 3.6k

प्रेमपरीक्षा हिवाळ्यातील थंडगार सकाळ होती. सभोवतालचा निसर्ग अजूनही धुक्याची दुलई पांघरून साखरझोपेत होता. पक्षांची नाजुक किलबिल आणि झाडांच्या फांद्यातून फिरणारा उनाड वारा मिळून भूपाळी गात होते. आळसावलेल्या सूर्याने नुकतच डोकं वर काढलं. त्याची कोवळी कोवळी किरणं सगळा आसमंत व्यापू पाहत होती. पिवळट केशरी रंगाचे फर्राटे ओढलेल्या ढगांवर सकाळी कामाला जाणाऱ्या पक्ष्यांची एक वेगळीच नक्षी उमटत होती. ती रोजप्रमाणे कॉफीचा मग घेऊन बाल्कनीतून पहाटेच रूप न्याहाळत होती. ' शहरात पण पहाट प्रसन्नच होते... आपल्याला फक्त अनुभवायला यायला हवी ' ही त्याची पहाटेची फिलॉसॉफी. ती म्हणजे सूर्यवंशी... सूर्य उठल्याशिवाय आपण नाहीच उठायचं हे वाक्य घोकतच झोपणारी. तिची पहाट नेहमीच आठ वाजता उगवायची.