ना कळले कधी Season 1 - Part 34

(18)
  • 13.4k
  • 2
  • 9.3k

'हो वाचलंय न! म्हणूनच तर विचारतोय की काय होत ते.', सिद्धांत म्हणाला. 'अरे यार!! काय हे सर, का वाचलं ते सगळं!' 'कॉल मी सिद्धांत, लिहिताना तर तू सिद्धांतच लिहिते ना, बरोबर ना!', आर्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तर सिद्धांतला फार मजा येत होती, पण आज तो थांबणार नव्हता. आज आर्या कडून वदवूनच घ्यायचं हे त्याने ठरवलं होतं. 'आर्या बोल न!' 'सर ते काय आहे न.......!' 'सर नाही, सिद्धांत म्हण.' 'अस कस म्हणणार!', आर्या म्हणाली. 'सोप्प आहे, जितक्या सहज पणे लिहिलं तितक्याच सहजतेने.', सिद्धांत तिला म्हणाला. 'नाही मला नाही जमणार!' आर्या म्हणाली. 'बर.. सिद्धांत तर तू मला म्हणणारच, आज नाही तर उद्या..